laghupanchmool instead of stri dudh
१) अष्टांग हृदयामध्ये स्त्री दुग्धाचे गुणधर्म सांगताना--वात, पित्त,रक्त, अभिघात,जन्य नेत्ररोग हे स्त्री दुग्धाच्या तर्पणाने किंवा अश्चोतन किंवा नस्य याने जिंकले जातात.
२) स्त्री दुग्धाने मनुष्य शरीराची निर्मिती झाली आहे. जर नेत्राला काही आघात किंवा वात पित्त रक्त दुष्ट झाल्यास स्त्री दुग्ध वापरावे.
३) वाग्भट यांनी उत्तर स्थानात बाळाला जर स्त्री दुग्ध मिळाले नाही तर शेलीचे दुध किंवा लघु पन्चमूल सिद्ध दुध किंवा शालीपर्णी सिद्ध दुध चालेल.
४) म्हणून स्त्री दुध ऐवजी लघु पंचमूल सिद्ध दुध वापरावे . म्हणजेच लघुपंचमूळ हे शरीर निर्मिती किंवा शरीर अवयव निर्मिती साठी वापरू शकतो .
५) नेत्र रोग साठी लघु पंचमूल सिद्ध तूप याचे नस्य, अश्चोतन किंवा तर्पण करावे .
६) आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये जिथे जिथे स्त्री दुध किंवा बकरी दुध आले असेल तिथे तिथे लघु पंचमूल सिद्ध दुध किंवा शालीपर्णी सिद्ध दुध वापरावे. म्हणजे फक्त पान नव्हे तर बस्ती, तेल , तूप बनवण्यासाठी सुद्धा.
७) वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत लघु पंचमूल सिद्ध दुध किंवा शालीपर्णी सिद्ध दुध यांनी अवयव निर्मिती करता येते.
Comments
Post a Comment