chitrak on snayu rog

१) भैषज्य रत्नावली मध्ये स्नायु रोग सांगताना त्याची चिकित्सा करताना सांगतात  की औषधे  किंवा अन्न हे अग्निदीपक, बलवर्धक आणि वातानुलोमक असले पाहिजेत.
२) स्नायु रोगात मुख्यतः बळ कमी झाले असते , अग्निमांद्य  आणि मलावरोध असतो .
3) स्नायु हा मेद धातू चा  उपधातू आहे ,मेदाच्या खर पाकापासून उत्पन्न होतो आणि मांस धातूचे मूळ स्थान आहे .स्नायु हे मर्म सुद्धा आहे.उदा .- बस्ती हे स्नायु मर्म आहे. 
४) स्नायु रोगात मुख्यतः चिकित्सेत चित्रकाच्या भावना दिलेल्या औषधांचा वापर जास्त  केला आहे. 
५) चित्रक हा  चरकांच्या---दीपनीय,भेदनीय, तृप्तीघ्न, लेखनीय,अर्शोघ्न----या गणात आलेला आहे. 
६) या वरून असे लक्षात येते की चित्रक हा मांस गामी असून माळाला बाहेर काढतो, मांस शैथिल्य कमी करतो, आणि अर्शाचे जे दुष्य आहेत ( त्वक, मांस, मेद ) तेथील संप्राप्ती भंग करतो.


Comments

Popular Posts